हेमंत आठल्ये

सानिया मिर्झा दरिद्र्य रेषेखाली

In बातमी on जून 25, 2009 at 4:49 pm

सकाळ – भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झाची आर्थिक परिस्थिती ‘हलाखी’ची असून, तिच्या नावाचा समावेश चक्क सरकारदफ्तरी ‘दारिद्रयरेषेखालील’ कुटुंबात करण्यात आला आहे. तसेच गरीबांसाठी तयार करण्यात आलेल्या रेशनकार्डातही तिचे नाव नोंदविण्यात आले असून, त्या नावाचा चक्‍क फोटोपासही असल्याचे आढळून आले आहे.
हे तर काहीच नाही, याशिवाय तिचे लग्नही झाले असून, एक वीसवर्षीय तरुण तिचा नवरा असल्याचे या कागदपत्रांत नमूद करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारी कारभारावर पुनश्‍च प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.

राज्याच्या हितासाठी निर्दयपणे सत्ता राबवेन

In म. टा. खास on जून 23, 2009 at 6:15 pm

महाराष्ट्र टाइम्स : राज्य आणि प्रशासन यांच्यावर नियंत्रण नसलेल्या राजकारण्यांनी देशाची संपूर्ण वाट लावली आहे. माझ्याकडे राज्याची सत्ता आली तर, ती राज्याच्या हितासाठी निर्दयपणे राबवेन, अशी थेट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘स्टार माझा’च्या परिसंवादात मांडली. त्याचवेळी इतर राजकीय नेत्यांनी मात्र राज्याच्या विकास आणि समृद्धीचे मनोहारी रुप मांडत २०२० मधील राज्याचे चित्र रेखाटले.

5 लाख भय्ये !!!

In बातमी on जून 5, 2009 at 6:54 सकाळी

मटा ऑनलाइन वृत्त: गेल्या पाच वर्षांत परराज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्यांच्या यादीत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या सर्वाधिक असल्याची आकडेवारी खुद्द राज्य सरकारनंच आज विधिमंडळात सादर केली आहे. त्यामुळे मनसेचं, राज ठाकरेंचं परप्रांतियांविरोधातलं आंदोलन अकारण नव्हतं, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय. 

Follow

Get every new post delivered to your Inbox.