शेअर बाजार कोसळल्याने आर्थिक फटका तर बसतोच, परंतु नवरा-बायकोचे नाजुक नातेसंबंधही धोक्यात येऊ शकतात. अहमदाबादमधील एक महिला सध्या त्याचा अनुभव घेतेय… शेअर बाजार कोसळल्याने या महिलेला ३० लाख रुपयांचा फटका बसला. त्यामुळे तिच्यावर चिडलेल्या नव-याला घटस्फोट हवाय, अशी कैफियत या महिलेनेच मांडली आहे. Read the rest of this entry »
Archive for ऑक्टोबर , 2008|Monthly archive page
६० वर्षांची ‘ड्रीम गर्ल’
In बातमी on ऑक्टोबर 16, 2008 at 6:40 सकाळी‘ ड्रीम गर्ल ‘ म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती हेमा मालिनीच ! बॉलिवूडची ही लाडकी ड्रीम गर्ल चक्क ६० वर्षांची झालीय… विश्वास बसत नाही ना… पण काळ आणि वय कुणासाठीही थांबत नसतं, हेच खरं… हेमा मालिनीनेही आज साठीमध्ये पदार्पण केलं. परंतु साठीच्या सुरकुत्या तिच्या चेह-यावर अजिबात दिसत नाहीत. ती अजूनही अगदी तश्शीच दिसते… किसी शायर की गझल… ड्रीम गर्ल ! किसी फुल का कंवल… ड्रीम गर्ल.. ! Read the rest of this entry »
हा तर ज्याचा त्याचा प्रश्न – नाना पाटेकर
In बातमी on ऑक्टोबर 15, 2008 at 6:09 सकाळीनाना पाटेकर
लिव इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कायदा करणार असल्याचं जाहीर झालं आहे. तो कायदा काय असणार आहे, हे मला माहीत नाही. कायदा करावा का न करावा, हा पूर्णपणे राज्य सरकारचा प्रश्न आहे. काहींना कायदा असावा, असं वाटेल, तर काहींना कायदा असू नये, असं वाटू शकेल. पण मला मात्र त्याबाबत काहीच मत नाही.
Read the rest of this entry »
काळबादेवीत मोठी आग, एकाचा मृत्यू
In बातमी on ऑक्टोबर 14, 2008 at 10:10 सकाळीकाळबादेवी भागातील विजया बँकेच्या जोहरी मेन्शन बिल्डिंगला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर पाच जण जखमी झालेत. सकाळी पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच इमारतीतल्या कापडाच्या गोदामांनीही पेट घेतला. अग्निशमन दलाची १० फायर इंजिन, ६ टँकर आणि तीन अँम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतं.
Read the rest of this entry »
इंडियन मुजाहिदीनचे ‘नामकरण’ अंधेरीत
In बातमी on ऑक्टोबर 14, 2008 at 10:00 सकाळी‘ स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’च्या (सिमी) छत्रछायेतून बाहेर पडलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’चे (आयएम) ‘नामकरण’ अंधेरी रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या मॅकडोनाल्ड्समध्ये पार पडल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याबरोबरच ई-मेलच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला होता.
जातीय दंगलीत महाराष्ट्र पहिला
In बातमी on ऑक्टोबर 14, 2008 at 6:25 सकाळीसातत्याने पुरोगामित्वाचे ढोल बडवणाऱ्या आणि समाजसुधारकांचा वारसा पदोपदी सांगणाऱ्या महाराष्ट्रात जातीय हिंसाचाराने कळस गाठला असून गेल्या सुमारे आठ वर्षांमध्ये देशात सर्वाधिक जातीय दंगली महाराष्ट्रात झाल्याची अधिकृत आकडेवारीच समोर आली आहे. Read the rest of this entry »